http://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त, सचिन पाटील यांचे आदेश – INL NEWS LIVE NETWORK (P)LTD.

मुंबईतील ३ डान्सबारचे परवाने रद्द – पोलीस उपायुक्त, सचिन पाटील यांचे आदेश

.                                                        *Binu Wargish*
*मुंबई –* मुंबई पोलिसांनी बहुचर्चित असलेल्या ३ डान्सबारचे परवाने सुनावणीअंती रद्द केले असून मुंबई पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी हे आदेश दिले आहेत . या कारवाईमुळे डान्सबार मालकांचे धाबे दणाणले आहे . परवाना रद्द करण्यात आलेल्या बारमध्ये हॉटेल इंडियाना , ऑरो पंजाब व हॉटेल साईप्रसाद यांचा समावेश आहे . या बारना २०१६ मध्ये सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबईमध्ये परवानगी देण्यात आली होती मात्र या प्रकरणाची सुनावणी घेऊन हे परवाने रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत । गेल्या साडे तीन महिन्यांच्या काळात पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी १४ हुन जास्त डान्सबारचे परवाने रद्द केले असून एकट्या जानेवारी २०१८ या महिन्यात ५ आर्केस्ट्रा व मुंबईतील सर्व परवाने रद्द केले आहेत . मुंबई पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सचिन पाटील यांनी डान्सबार विरोधात कारवाईची मोहीम हाती घेत परवाने रद्द केले आहेत . डान्स बार मधील छमछम बंद झाल्याने बार मालक लॉबी चांगलीच वैतागली आहे .

Comments

comments

x

Check Also

Mumbai: Ekta Kapoor felicitated with the Digital Content Person Of The Year at Talentrack awards 2018

Talentrack, country’s leading hiring & networking platform for the media, entertainment & creative industry, hosted a star-studded award event last ...